Thursday, May 24, 2012

रॉकेल कोटा कपातीचा मार गरिबांच्याच माथी-लोकमत

रॉकेल कोटा कपातीचा मार गरिबांच्याच माथी-लोकमतकेंद्र शासनाने राज्य शासनाच्या रॉकेलच्या कोट्यात कपात केली आहे. यामुळे राज्य शासनाने ३२ जिल्ह्यांचा कोटा कमी करून त्यात थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल २४ टक्क्यांनी कपात केली आहे. या कपातीचा फटका रिटेलरपेक्षा सर्वसामान्यांना अधिक बसत आहे. त्यांना रॉकेलकरिता राशन दुकानांसमोर रांगा लावाव्या लागत असून शासनाच्या मानकानुसारही त्यांना रॉकेल मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
यातच आता पेट्रोलची दरवाढ झाल्याने रॅकेलच्या काळाबाजाराला जोर येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. पेट्रोल दरवाढ झाल्याने वाहन चालकांना रॉकेल विकण्याच्या प्रकारात वाढ होणार हे निश्‍चित झाले आहे.
राज्यातील इतर जिल्ह्याचा कोटा कमी करण्यात आला असला तरी उस्मानाबाद जिल्ह्याचा कोटा या महिन्यात वाढविण्यात आला आहे. मार्च महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्याचा कोटा १८९६ किलोलिटर होता. यात ३00 किलोलिटरची वाढ करून येथील कोटा २१९६ किलोलिटर करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात मार्च महिन्यात १२२४ किलोलिटरचा कोटा होता. यात एप्रिल महिन्यात ४८0 किलोलिटरची कपात करून हा कोटा ७४४ किलोलिटर करण्यात आला आहे.
राज्यात सुरू असलेला रॉकेलचा काळाबाजार थांबविण्याकरिता मध्यंतरी विशेष मोहीम राबविली होती. ती मोहीम कालांतराने थंडावली आहे. यात आता पुन्हा तेल माफिया निर्ढावले आहेत. केंद्राच्या आदेशाने राज्य शासनाने रॉकेलचा कोटा कमी केल्याने त्यांच्या काळ्याबाजाराच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे चवताळलेल्या तेल माफियांनी आपला काळाबाजार कायम ठेवत गरिबांचे रॉकेल कापण्याचा सपाटा सुरू केला आहे.
एका व्यक्तीला महिन्यात दोन लिटर रॉकेल देण्याचे शासनाचे मानक आहे. यात शासनाने रॉकेल कपात केल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्या मानकानुसार रॉकेल मिळणे बंद झाले आहे. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता त्यांना शासनानेच कोट्यात कपात केली आहे, आम्ही काय करणार, असे म्हणून नागरिकांची बोळवण करीत आहेत.मानकानुसार रॉकेलच्या कोट्यात कुठलीही कपात केली नाही. यामुळे आवश्यकतेनुसार रॉकेल देण्याची जबाबदारी रिटेलरची असल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला विचारणा केली असता जिल्ह्याचा कोटा कमी करण्यात आल्याने जिल्ह्यात शिधापत्रिकांच्या संख्येनुसार रिटेलर्सचा कोटा कमी-अधिक करण्यात येत आहे. यानुसार नागरिकांना रॉकेल पुरविले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यात कमी झालेले रॉकेल टक्क्यात
ठाणे २५.२, रायगड २४.५, रत्नागिरी १७.५४, सिंधुदूर्ग २२.८६, नाशिक २५.५, धुळे ३२.४६, नंदुरबार १५.६३, जळगाव २१.९, अहमदनगर २४.७, पुणे ३६.२८, सातारा २८.५७, सांगली २६.0१, सोलापूर १५.४१, कोल्हापूर १0.३८, औरंगाबाद २९.२२, जालना २७.२७, परभणी २५.८५, हिंगोली २२.१२, बीड २२.४१, नांदेड ३६.२८, लातूर ४.0.१९, बुलडाणा ४0.00, अकोला ३६.३६, वाशिम ३३.७२, अमरावती ४0.१, यवतमाळ ४0.१, वर्धा ३९.२२, नागपूर २५.४, भंडारा २३.६६, गोंदिया २0.१९, चंद्रपूर २१.५८, गडचिरोली ११.५९ टक्क्यांनी रॉकेलचा कोटा कमी झाला आहे.
नागरिकांना मानकानुसारच रॉकेल
शासनाने रॉकेलच्या कोट्यात एप्रिल महिन्यापासून कपात केली आहे. यात हॉकर्सच्या कोट्यात कपात केली असली तरी नागरिकांना मिळत असलेल्या कोट्यात कुठलीही कपात करण्यात आली नाही. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला महिन्याकरिता दोन लिटर रॉकेल देण्याचे निर्बंंध आहेत. त्यांना तेवढे रॉकेल देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अंभोरे यांनी सांगितले. रॉकेल कपातीत वर्धेत ३९.२२ टक्के रॉकेल कमी झाले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात रॉकेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात हॉकर्सकडून होत असलेल्या काळ्याबाजारामुळे रॉकेल मिळणे कठीण झाले आहे.

Sunday, May 20, 2012

सर्व आर्शमशाळेत 'सीसीटीव्ही' कॅमेरे लावा -किशोर तिवारी


सर्व आर्शमशाळेत 'सीसीटीव्ही' कॅमेरे लावा -किशोर तिवारी

 लोकशाही वार्ता/ २0 मे

यवतमाळ : महाराष्ट्र सरकारने आर्शमशाळेतील राजकीय नेत्यांचा गोरखधंदा बंद करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीची शाहनिशा करण्यासाठी संगणकीकृत इंटरनेटद्वारे अंगठा लावून बायोमॅट्री करणारी पद्धती सर्व आर्शमशाळेत आवश्यक केली आहे. ज्या आर्शमशाळा ही व्यवस्था करणार नाही व केल्यानंतरही जाणूनबुजून बंद ठेवणार त्या दिवसांचे विद्यार्थ्यांचे अनुदान व शिक्षकाचा पगार न देण्याचे सक्त आदेश सरकारने काढले आहे. सरकारने आर्शमशाळेतील पटसंख्यांचा व बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधींचे अनुदान लाटण्याचा गोरखधंदा सुरू होता. मात्र आता संस्थाचालकांना चाप बसणार आहे. या निर्णयाचे विदर्भ जनआंदोलन समितीने स्वागत केले आहे. किशोर तिवारी यांनी काही शाळा बायोमॅट्री यंत्र खेडसाळ पद्धतीने बंद ठेवत असल्याची तक्रार आदिवासी आयुक्तांना केली असून या शाळा संचालका विरुध्द तत्काळ कारवाई करून या शाळा सरकारने ताब्यात घ्याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 

उपस्थितांच्या बायोमेट्रिवर पटतपासणी करून आर्शमशाळेच्या राजकीय नेत्यांनी सुरू केलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचार फक्त २५ टक्क्यांनी कमी होणार मात्र शळेच्या जेवणावळीत भांडारघर प्रत्येक वर्ग व विद्यार्थ्यांच्या झोपण्याच्या जागेवर २४ तास रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेर्‍याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या अति निकृष्ट जेवणाची व शिक्षकांकडून देण्यात येणार्‍या शिक्षणाची संपूर्ण माहिती सरकारला होईल. सध्याच्या परिस्थितीत सरकार एका विद्यार्थ्यावर प्रतिमहा १२00 रुपये खर्च करते तर संस्थाचालक प्रती विद्यार्थ्यांवर जेमतेम २0 रुपये खर्च करतात व त्यांना कधीच दूध, फळ वा अंडीसारखा सकस आहार देण्यात येत नाही. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कधीच चांगले शिक्षक उपलब्ध राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर सतत अन्याय होत असून शिक्षणाचा दर्जाही आर्शमशाळेत अतिशय खालावला आहे. अशा परिस्थितीत आर्शमशाळेचा आहार व्यवस्था, शिक्षण प्रणाली व इतर सर्व हालचालीचे चित्रीकरण करण्यात यावे यासाठी सीसीटीव्ही., भोजनघर, भांडारघर व विद्यार्थ्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

Tuesday, May 15, 2012

चंद्रपूर जिल्ह्यातील २४0 गावांत फ्लोराईडयुक्त पाणी-लोकमत

 चंद्रपूर जिल्ह्यातील २४0 गावांत फ्लोराईडयुक्त पाणी-लोकमत 
थातूरमातूर उपाययोजना करून प्रशासनाकडून बोळवण
  दि. १५ (चंद्रपूर)
मायबाप सरकारचे दुर्लक्ष अन् प्रशासनाची दिरंगाई, यामुळे स्वातंत्र्याच्या साठीनंतरही चंद्रपूर जिल्ह्यातील २४0 गावांना फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या भेडसावत आहे. यापैकी १२ गावे अजूनही १00 टक्के फ्लोराईडयुक्त आहेत. फ्लोराईडची सर्वाधिक समस्या चिमूर तालुक्यात आहे. या तालुक्यातील ३८ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी आहे. गंभीर बाब ही की, फ्लोराईडयुक्त पाणी समस्येवर उपाययोजना केवळ कागदोपत्री आहेत.
जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात ६, भद्रावती २२, ब्रह्मपुरी ३, चंद्रपूर १६, चिमूर ३८, गोंडपिपरी ७, जिवती २, कोरपना १६, मूल १३, नागभीड १६, पोंभुर्णा १५, राजुरा १४, सावली ११, सिंदेवाही २९, तर वरोरा तालुक्यातील ३२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या आहे. तर येनबोडी (बल्लारपूर), शेलोटी, कोंडेगाव (माळ) (भद्रावती), वलनी, वेंडली (चंद्रपूर), बरडघाट, वाघळपेठ (चिमूर), आसन (बु.) (कोरपना), उमरझरी (राजुरा), चिखल मिनघरी (सिंदेवाही), सुसा व भिवकुंड (वरोरा) ही गावे १00 टक्के फ्लोराईयुक्त आहे. यापैकी केवळ तीन गावांमध्ये पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ७५४ गावे आहेत. सन २00५ मध्ये जिल्ह्यातील १३ हजार ७९५ स्त्रोतांचे रासायनिक तथा जैविक परीक्षण करण्यात आले होते. त्यापैकी २४0 गावांमधील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण मानकापेक्षा जास्त म्हणजे १.५ पीपीएमपेक्षा अधिक आढळले होते. सद्यस्थितीत ३ हजार ८२ स्त्रोतांपैकी ५४८ स्त्रोत बाधीत असून २ हजार ५३४ स्त्रोत सुरक्षित आहेत. १00 टक्के बाधीत असलेली १२ गावे असून ७७ ते ९९ टक्के फ्लोराईडने बाधीत गावांची संख्या ३६ आहे. ५0 ते ६९ टक्के बाधीत असलेली ६३ गावे असून १ ते ४९ टक्क्यांमध्ये १२९ गावांचा समावेश आहे. ३१ मार्च २0१0 पर्यंंंत गावांमधील सुरक्षित स्त्रोत तसेच इतर उपाययोजनांद्वारे १४२ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. फ्लोराईडने बाधीत २४0 गावांपैकी फक्त ४२ गावांमधील फ्लोराईडबाधीत स्रोतांवर फ्लोराईड रिमोव्हल संयंत्र बसविण्यात आले आहे. यासोबतच आणखी ४0 गावांमध्ये फ्लोराईड रिमोव्हल संयत्र बसविण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Wednesday, May 9, 2012

यवतमाळ जिल्ह्यात फ्लोराइडयुक्त 454 गावे- सकाळ वृत्तसेवा


यवतमाळ जिल्ह्यात फ्लोराइडयुक्त 454 गावे- सकाळ वृत्तसेवा
- सकाळ वृत्तसेवा
Thursday, May 10, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: fluoride,   water,   yavatmal,   vidarbha
http://www.esakal.com/esakal/20120510/5717764707959974877.htm 
यवतमाळ - महाराष्ट्र सरकारने 2001मध्ये मंगी कोलामपोडावर फ्लोराइडचे विषारी पाणी पिल्यामुळे आदिवासींना गंभीर आजार होऊन मृत्यू झाला होता. यासंदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व फ्लोराइड, इतर विषारी खनिज पाण्यामध्ये असणारे पाण्याचे स्रोत बंद करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचे शपथपत्रच सरकारतर्फे सादर करण्यात आले होते. मात्र, अद्याप या गावांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या विशेष चमूने घेतली होती, त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यास भेट दिली होती. शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्याचे मंगी व करंजी येथील पोडावर सरकारने कृत्रिमरीत्या सुविधा तयार करूनसुद्धा दाखविले होती. मात्र, याच महिन्यात आरोग्य विभागाने अधिकृतपणे यवतमाळ जिल्ह्यातील 454 गावांमध्ये फ्लोराइडयुक्‍त पाणी गावकरी राजरोसपणे पीत असल्याचा अधिकृत अहवालच पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत सादर केला. विशेष म्हणजे या बैठकीत संबंधित विभागाने हा अहवाल सामाजिक न्यायमंत्री ऍड. शिवाजीराव मोघे, पालकमंत्री नितीन राऊत व विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांना सादर केला आहे. हे सर्व प्रकरण सुनियोजितपणे मनुष्यवधाचा गुन्हा असून, या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिकाही श्री. तिवारी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर सादर केली आहे. यापूर्वीही श्री. तिवारी यांची याच विषयावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमक्ष या विषयावरील त्यांच्या चार तक्रारींवर सरकारविरुद्ध आदेश प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत 454 गावांमध्ये विषारी पाणी सरकार पाजत आहे. हा अधिकृत खुलासा अनेक सनदी अधिकाऱ्यांना फार महाग पडणार, असे चित्र समोर येत आहे. आपण या 454 खेड्यांतील सर्व गावकऱ्यांची आरोग्यतपासणी करून विषारी पाणी दीर्घ मुदतीपर्यंत पिल्यामुळे शरीरात आलेले अपंगत्व व जडलेले गंभीर आजार याचा संपूर्ण अहवालच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला सादर करणार आहे. या सर्व गावकऱ्यांना विषारी पाणी पाजणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नुकसानभरपाई देण्याचे व या 454 गावांमध्ये लोकांना यंत्राने शुद्ध केलेले पाणी 50 लिटरच्या कॅनमध्ये प्रतिकुटुंब रोज द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या 454 गावांत जिल्हा प्रशासनाने शुद्ध केलेले पाणी कॅनने व बाटलीत प्रत्येक कुटुंबाला तत्काळ द्यावे, यासाठीसुद्धा आपण स्थानीय न्यायालयात सरकारविरुद्ध तक्रार करणार असल्याची माहितीही याचिकाकर्ते किशोर तिवारी यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील दोन हजार गावांपैकी अधिकृत आकडेवारीनुसार 454 गावांमध्ये सर्व ग्रामवासी विषारी पाणी पितात, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे अतिरिक्‍त मुख्य सचिव एम. रमेशकुमार यांनी जिल्ह्याला भेट देऊन एकही गाव फ्लोराइडयुक्‍त पाणी पिणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, सरकारने या दिशेने कोणतीही कारवाई केली नाही. यवतमाळ, मारेगाव, पुसद, उमरखेड, केळापूर, वणी, झरी, घाटंजी, आर्णी, दिग्रस, दारव्हा व राळेगाव या तालुक्‍यांतील सरासरी 30 ते 40 गावांमध्ये गावकऱ्यांना फ्लोराइडयुक्‍त पाणी प्यावे लागत आहे. यामुळे त्यांचे दात व हातपाय ठिसूळ होऊन शरीरामध्ये रक्‍ताशय, मधुमेह व अनेक गंभीर आजार होताहेत. सर्व लहान मुलांचे दात खराब होऊन पडत असल्याचेही सरकारी अहवालातच म्हटले आहे. सरकारने मंगी कोलामपोडाचे प्रकरण समोर आल्यानंतर ज्या योजना राबविल्या, त्यात अधिकारी कोट्यधीश झाले. मात्र, आदिवासी व कोलामांना विषारी पाणी पिऊन मरावे लागत आहे. उच्च न्यायालयाने दहा वर्षांपूर्वी आपल्या आदेशात पिण्याचे पाणी सरकारने या सर्व खेड्यांवर शासकीय यंत्रणेद्वारे शुद्ध करून कॅनद्वारे पुरविण्याचे स्पष्ट आदेशही दिले होते. सरकारनेही अंमलबजावणी करण्याचे शपथपत्रच दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झालेली नाही. जे यंत्र पाणी शुद्ध करण्यासाठी लावले होते, तेसुद्धा बंद पडले असल्याचेही श्री. तिवारी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

Monday, May 7, 2012

Fresh notification on cotton export disappoints farmers -Merinews.com


Fresh notification on cotton export disappoints farmers  -Merinews.com
 Last week only, three million cotton farmers of Vidarbha, who are facing crop losses and committing suicides at the rate of three farmers a day, had welcomed the commerce minister Anand Sharma's announcement that the government has decided to withdraw the ban. But fresh notification has brought only gloom to shatter their dreams, alleged a farm activist, Kishore Tiwari.
THE UPA government’s flip-flop policy on free cotton export under Open General License (OGL) continues even after PMO’s intervention as Director General of Foreign Trade (DGFT) issued fresh Notification No. 113 (RE-2010)/2009-14 on 4th May, 2012 imposing fresh quota for revalidation of pending RCs
This will not allow any further cotton export as main exporter will not permit exports while fresh exporter will get peanuts and once again such conditional lifting of cotton export ban by the union commerce and industry minister is nothing but eyewash. The DGFT notification issued on yesterday has disappointed exporters, traders and cotton farmers of the country, opined president of Vidarbha Jan Andolan Samiti (VJAS) Kishore Tiwari.

These are fresh stringent conditions for the registration introduced by DGFT:

An exporter can apply for one RC at a time for a maximum quantity of 10,000 bales (1 bale=170kg) or actual quantity exported in the current cotton season, whichever is less. Exporters who have exported up to 1500 bales during current cotton season and newcomers (a new comer is an exporter who has not exported cotton in the current cotton season) can apply “up to 1500 bales”. Eligibility to apply for a subsequent RC will be on completion of at least 50% of the exports against the RC obtained now under this notification (exporters would be required to submit the documentary proof of such exports to the concerned RAs along with the application for issue of new RC).

For ease of calculation, RC holders are encouraged to apply in next higher multiples of 10. (For example an exporter who has exported 1387 bales during current cotton season is encouraged to apply for 1390 bales).

It is reiterated that revalidation of Registration Certificates will not be permitted as mentioned in para 3 of Public notice 102 of 16th March 2012.

"We demand blanket lifting of export ban under free export of raw cotton under open general license that can save debt trapped seven million farmers of India," said Tiwari.

Tiwari demanded a CBI probe into the circumstances that forced to take the ill-motivated decision to enforce a fresh ban on the cotton export in the light of the revelation of the union agriculture minister Sharad Pawar, observations of the fact finding committee of GOM and the protest by the chief ministers of Maharashtra, Gujarat and Andhra Pradesh. He has also urged the PM to sack Sharma for misleading the government and public.

"Last week only, three million cotton farmers of Vidarbha, who are facing crop losses and committing suicides at the rate of three farmers a day, had welcomed the commerce minister Anand Sharma's announcement that the government has decided to withdraw the ban. But fresh notification has brought only gloom to shatter their dreams," Tiwari said, adding that the minister misled the media and innocent farmers.

"It is highly immoral and illegal hence we urge the PM to review the notification and bring back pre-export ban conditions so that cotton export is protected. If UPA Government has problem with the growth of cotton export and want to protect textile cartel then they should buy cotton at international rates through its agencies like NAFED and CCI," Tiwari said, adding, "It would help protect the farmers who are forced to sell cotton at throw away prices to local dealers.”

"Domestic demand is just 20 million bales as against national production of 35 million bales. There is no reason to put restrictions when interests of domestic textile mills are fully protected," Tiwari pointed out
===============

Saturday, May 5, 2012

तेंदूपत्ता बोनस, रोहयोसाठी बायोमेट्रिक अनिवार्य करा- शेकडो आदिवासी मजुरांची मागणी


तेंदूपत्ता बोनस, रोहयोसाठी बायोमेट्रिक अनिवार्य करा- शेकडो आदिवासी मजुरांची मागणी
मजुरांच्या नावावर मशीनचा वापर; मजुरी कंत्राटदारांच्या हातातमेळाव्यास उपस्थित महिला.मेळाव्यास मार्गदर्शन करताना किशोर तिवारी व उपस्थित नेते
 
 

 
 
 
 
 
यवतमाळ: तेंदूपत्ता बोनस वाटपामध्ये आज शेकडो मजुरांनी ३ वर्षांपासून होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीचा पाऊसच पाडला. रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांच्या नावावर मशिनीचा वापर व मजुरांची मजुरी कंत्राटदाराच्या हातात, हा प्रकार राजरोसपणे होत असून तेंदूपत्ता बोनस वाटप व रोजगार हमी योजनेच्या कामामधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी दोन्ही योजनेमध्ये कामावर व मजुरी देताना अंगठय़ावर आधारित संगणकीकृत छायाचित्राच्या बायोमेट्रिकचा वापर अनिवार्य करावा, असा एकमुखी ठराव आज पांढरकवडा येथील तेंदूपत्ता व रोजगार हमी योजनेवर काम करणार्‍या आदिवासी मजूर मेळाव्यात घेण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी होते तर यावेळी आदिवासी नेते लेतुजी जुनघरे, तुकाराम मेर्शाम, अंकित नैताम, भीमराव नैताम व शेतकरी नेते मोहन जाधव, मोरेश्‍वर वातिले, सुरेश बोलेनवार, नंदू जयस्वाल, संतोष नैताम, सुनील राऊत, राजू राठोड, गजानन गोदुरवार उपस्थित होते. यावेळी शिबला, पेंढरी, रोहपाट, टिटवी, मेंढणी, आंबेझरी, सुसरी, कारेगाव, रामगाव, कोंडझरी , वसंतनगर, पोटगव्हाण या गावातील शेकडो मजुरांनी, वनखात्यातील कर्मचार्‍यांनी तर काही ठिकाणी राजकीय नेत्यांनी सर्वच्या सर्व रोजगार हमी योजनेचे कार्ड गोळा केले. मात्र आम्हाला मागील ४ महिन्यांपासून काम मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. अनेक ठिकाणी तर तेंदूपत्ता मजुरांचे मागील ३ वर्षांचे अख्खे बोनस वनअधिकार्‍यांनी लाटल्याची तक्रारही समोर आली, हा सगळा प्रकार प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाणारा असून या सर्व तक्रारी आम्ही सरकार दरबारी चौकशीसाठी सादर करणार, अशी माहिती यावेळी विदर्भ जनआंदोलन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी दिली.
शेतकर्‍यांच्या शेतातील सर्व कामे रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू करून शेतकर्‍याला या योजनेचा लाभ मिळवून द्यावा व खरीप हंगामातील कमीत कमी शेतकर्‍यांच्या शेतावरील १२0 दिवसांच्या कामाची, शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची व त्यांच्या शेतावर काम करणार्‍या शेतमजुराची मजुरी सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अनुदान स्वरुपात तत्काळ सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जी कामे शेतमजुर व शेतकरी १४५ रुपये दराने करू शकत नाही व त्या ठिकाणी अधिकारी स्वयंचलित यंत्राचा वापर करतात, अशा सर्व कामाचा रोजगार हमी योजनेतून समावेश न करता राज्याच्या योजनेच्या विकास निधीमधून करण्यात यावा जेणेकरून राजरोसपणे होत असलेला भ्रष्टाचार संपुष्टात येईल व रोजगार हमी योजनेचे ग्रामीण रोजगार देण्यामध्ये सक्रिय सहभाग दिसून येईल. शेतकर्‍यांच्या शेतात मजुरांना सरासरी २00 रुपये मजुरी मिळत असताना मजुरांचा अभाव आहे, मात्र रोजगार हमी योजनेच्या कामावर फक्त १४५ रुपये दराने ५ हजारांवर मजूर यवतमाळ जिल्ह्यात अखंडपणे काम करत आहे. यावर या मेळाव्यात आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. सरकारी अधिकारी व सर्व लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचाराला मूक संमती देऊन आपली टक्केवारी निश्‍चित करून देशाला लुटत असल्याचा आरोप यावेळी किशोर तिवारी यांनी केला. आपण मजुरांचे मेळावे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करून हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करू, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

Friday, May 4, 2012

Tribal demands Bio-Metric ID for all Tendu and MGNEGS Workers in Tribal RallyPandharkwada- 4th May 2012

The tribals working under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGS) have not got their wages since February. Similarly tribals deployed for plucking the tendu leaves from the deep forest in Yavatmal district have also not been paid their bonus has unanimously demanded bio- metric photo identity compulsory at time of tendu leaves collection  and MGNERS work and payment of bonus and wages in order to stop rampant corruption and establish transparency in these hostile schemes  in a massive rally at Pandharkawda, 80km from Yavatmal organized today  on May 4 tribals also demanded central intervention by way of a CBI probe into the rampant corruption in the central and state Govt-sponsored schemes due to  undeterred apathy of the district administration and forest officials, informed  convener of Tendu Mazdoor Samiti Bhimrao Naitam.
VJAS leader Kishore Tiwari presided over tribal rally where as   veteran tribal leader Letu Junghare  and Tukaram Meshram moved the resolutions other main resolution other demands raised that include the extension of  Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGS) in farm works  of dry land farmers and direct wage subsidy of 120 days  to each farmers in under MGRENA ,Mohan Jadhav farm activist added .
“When the distress cotton farmers are not getting farm workers even they are paying more than Rs.200/- per day ,we are till confused how forest officials are getting more 5000 workers Rs.145 per day ,this is clearly this is case of hostile corruption and Guardian Minister of Yavatmal  who is also EGS Minister Nitin Raut is directly involved and he should be sacked  immediately ” Kishore Tiwari said while addressing the tribal arlly.

The tribals, who are working simultaneously under the MGNREGS, have not been paid wages since January 2012 which is a criminal offence. "We demand the state government to order a CBI probe into the rampant corruption involved in both the matters (bonus and wages)," Naitam said.
Earlier VJAS president Kishor Tiwari has filed a complaint with chief minister Prithviraj Chavan demanding a probe into the allegation of pocketing the huge fund meant for implementation of MGNREGS by contractors, officers and the politicians. As per information, Chavan has forwarded the complaint to principal secretary Pravin Pardesi to look in to the matter on priority.
It is alleged that despite most of the work being done by machines, the contractors prepare bogus muster roll and show that the work's being done manually and pocket the entire fund. They do it with the blessings of the politicians and in connivance with some officials.
Tiwari further told in the rally that , "The contractors' agent collect job cards from the workers and with its support, they open accounts in remote post office and banks. The cheques against the wages are credited into these accounts and are withdrawn later as if the money were given to real labourers. Crores of rupees are siphoned off in this manner and the poor tribals are pushed in to the lurch, we are hopeful that collector Shravan Hardikar who has put on hold the issue of cheques amounting Rs.25 crore since January last will do the justice .
===================================================

Thursday, May 3, 2012

यवतमाळ जिल्हा ४५४ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी

यवतमाळ जिल्हा ४५४ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी
यवतमाळ / वार्ताहर, शुक्रवार, ४ मे २०१२
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=224794:2012-05-03-18-23-57&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60
पाणीटंचाईच्या प्रश्नामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ात फ्लोराईडयुक्त पाणी असलेली पाच दहा नव्हे तर चक्क ४५४ गावे असल्याची खळबळजनक माहिती असून या गावांना शुद्ध पाणी पुरवण्याची कोणतीच योजना आखण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात या गावांमध्ये निर्माण होणारे अनारोग्याचे संकट हासुद्धा सार्वजनिक चिंतेचा विषय झाला आहे.
पाणीटंचाई निवारण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांच्यासह प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. आढावा बैठकांचेही राजकारण सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने सेना भाजप अपक्ष यांच्याशी आघाडी करून सत्ता मिळवली असली तरी खरी परीक्षा आताच सुरू झाली असून पाणीटंचाईचे संकट दूर करणे हे आमच्यासमोर मोठे आव्हान आहे. आढावा बैठकांबरोबरच किती प्रमाणात जनतेची तहान शमवण्यात यश आले ही बाब अधिक महत्त्वाची आहे, अशी कबुली राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांनी दिली असून पाण्याचे राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, जिल्ह्य़ातील दोन हजार गावांपैकी ४५४ गावे फ्लोराईडयुक्त पाणी पितात हे अत्यंत कटू वास्तव असतानाही यापासून मंत्री, खासदार, आमदार हे सारेच अनभिज्ञ आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव एम.रमेश कुमार यांनी रखरखत्या उन्हात जिल्ह्य़ातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेटी दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी एकही गाव फ्लोराईडयुक्त पाणी पिणारे राहणार नाही, अशा योजना अंमलात आणण्याचे आदेश दिले होते. फ्लोराईडयुक्त गावांची संख्या नगण्य असून अशा दोन गावांना बैलगाडीने पाणीपुरवठा होतो, अशी त्यांना माहिती देण्यात आली होती. आर्णी तालुक्यातील सातारा गावात सत्यसाई सेवा समितीने एक यंत्र बसवून फ्लोराईडयुक्त पाणी फ्लोराईडमुक्त केले होते आणि त्या गावात पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे, असे प्रयोग युद्धस्तरावर होण्याची गरज असताना जिकडे तिकडे केवळ आढावा बैठकांचा व त्या बैठकांच्या राजकारणाचा सपाटा तेवढा सुरू आहे.
यवतमाळ, मारेगाव, पुसद, उमरखेड, केळापूर, वणी, झरी, घाटंजी, आर्णी, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, राळेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ३० ते ४० गावांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. मात्र पाणीटंचाई आढावा बैठकांमध्ये या दुर्दैवी गावांची चर्चा होत नाही. असंख्य गावांमध्ये पाण्याचे स्रोतच फ्लोराईडयुक्त आढळल्याने त्या गावातील कूपनलिका बंद करून काही ठिकाणी गावकऱ्यांना पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे.
आतापर्यंत दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा होत होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी १५ गावे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निवडून तशी परवानगी दिली आहे. स्वातंत्र्याच्या ६४ वषार्ंनंतर आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या ५२ वर्षांनंतरही हजारो लोकांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे.
हाडे ठिसूळ, हातपाय आणि दात वाकडे
पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे जे अशाप्रकारचे पाणी पितात त्यांना हाडे ठिसूळ होण्याच्या रोग होत आहे. दात गळून पडणे, हातपाय वाकडे होणे आणि हाडे ठिसूळ होणे अशा भयंकर रोगांना केवळ फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे आमंत्रण दिले जाते. उल्लेखनीय म्हणजे, ग्रामीण भागात ही समस्या जास्त आहे, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्य़ातील फ्लोराईडयुक्त पाणी समस्या असलेल्या गावांची संख्या राज्यात सर्वात जास्त असल्याची माहिती आहे. दरवर्षी कोटय़वधी रुपये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खर्च होतात, पण प्लोराईडयुक्त पाणी असलेली गावे फ्लोराईडमुक्त व्हावीत, यासाठी मात्र प्रयत्न कमीच पडले आहेत हे वास्तव आहे. फ्लोराईडमुक्तीचे अभियान चालवण्याची नितांत गरज असून लोकप्रतिनधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर भविष्यात उद्भवणाऱ्या मानवी संकटांना तोंड देणे कठीण जाणार आहे, एवढे मात्र निश्चित.   

Wednesday, May 2, 2012

VJAS follow up echos in India Parliament -PIB Release

Press Information Bureau
Government of India
Ministry of Commerce & Industry
02-May-2012 16:06 IST

http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=82933

Stringent Rules of Revalidation for Cotton Export
Vidarbha Jan Andolan Samithi through several e-mails have protested against the introduction of BT cotton and have also requested to allow export of cotton. The situation is under constant watch and appropriate action would be taken keeping in view the various factors such as production, availability of cotton in the domestic market, the price situation and various national and international commitments etc. The ban imposed on export of cotton on 05.03.2012 was subsequently revoked by the Government on 12.03.2012.

This information was given by Shri Jyotiraditya M. Scindia, Minister of State for Commerce, Industry and in written reply to a question in Rajya Sabha today.

DS/GK

Tuesday, May 1, 2012

Farmers commit suicide, Govt busy celebrating Maharashtra Day-BHASKAR


Farmers commit suicide, Govt busy celebrating Maharashtra Day-BHASKAR

 http://daily.bhaskar.com/article/MAH-MUM-farmers-commit-suicide-govt-busy-celebrating-maharashtra-day-3198719.html
Mumbai: On one hand, where the government is busy celebrating the Maharashtra Day, few miles away from the city, it was state of mourning for the Vidarbha farmers. In the last 24 hours, a total of five debt-laden farmers reportedly laid down their lives awaiting relief aid from the government. The farmers, who committed suicide in the Vidarbha region, also included a woman.

The failure of monsoons leading to series of droughts, lack of better prices, exploitation by middlemen and government hollow promises have taken the toll to 332 in the state in 2012.

According to Vidarbha Jan Andolan Samiti (VJAS), a farmer advocacy group, Ramdas Dhale of village Chincholi in Yavatmal district committed suicide early Tuesday. He was a cotton farmer who was in debt trap of around Rs 3 lakh.

"In the last 48 hours, four other farmers also committed suicide after they could not repay their debt. Their names are Ajabrao Meshram of Shivani and Ramnna Pedkulwar of Aril in Yavatmal, Parvatibai Kadel of Poharadevi in Washim, and Shriram Kakad of Sategaon in Amaravati," VJAS President Kishor Tiwari said on Tuesday.

"The total number of suicides by farmers has reached 332 in the past four months," he said.

He said like thousands of other farmers, the five farmers were waiting for relief aid declared in December 2011 by Maharashtra Chief Minister but hadn't received anything till date.

"Not much is being done to help farmers or prevent their suicides despite visits by several committees and political leaders, including Congress General Secretary Rahul Gandhi," Tiwari said.

According to VJAS, Maharashtra Agriculture Minister Balasaheb Vikhe Patil had officially admitted that standing crop on nearly 90 lakhs hectares were damaged due to poor monsoon and a dry spell in September, including 40 lakh hectares of the cotton crop.

"The government then went on to declare a relief amount of Rs 2,000 crore and cotton growers were assured minimum Rs 8,000 relief aid per family. However, they haven't received anything till date and it has resulted in this fresh spurt of suicides," VJAS said.

Moreover, cost of cultivation has jumped to almost double, not to mention lack of proper irrigation facilities for rain sensitive BT cotton crop, the VJAS added.

It adds that the state administration has not even prepared list of farmers who suffered crop failure.

Contrary to this, the state agriculture minister said the number of farmer suicides has been decreasing and Rs 1,300 crore of the sanctioned Rs 2,000 crore has already been disbursed.

Last week, in Yavatmal district, another farmer committed suicide by drinking pesticide. In his alleged suicide note, he asked co-farmers not to vote for the Congress and the NCP accusing them of failing to bring relief to distressed farmers.

The state government has failed miserably in implementing the prime minister’s special package for Vidarbha to improve irrigation in the region and stop farmer suicides.

In July 2006, Prime Minister Manmohan Singh had announced a package of Rs 3,750 crore, including writing off Rs 712 crore overdue interest on loans. The package, meant primarily for the six districts, included rescheduling of Rs 1,296 crore agricultural credit over 3-5 years. A moratorium of one year was granted as well.

The Maharashtra government did start several irrigation projects, but most of those are still to be completed.

With the contradicting stand of the government, the plea of debt-ridden farmers seems to have been falling on deaf ears.