Sunday, April 29, 2012

खतांच्या किमती आकाशाला भिडल्या-शासनच उठले शेतकरयांच्या जिवावर

खतांच्या किमती आकाशाला भिडल्या-शासनच उठले शेतकरयांच्या जिवावर

खतांच्या किमतीत चार ते पाच पटीने वाढ झाली असून आकाशाला भिडलेल्या खतांच्या किमतीमुळे आधीच अर्धमेला झालेल्या शेतकरयांचे यंदाच्या खरीप हंगामात कंबरडेच मोडणार आहे. खतांच्या किमती वाढल्याने शेतकरयांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच आरडाओरड सुरू केली असली तरी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास किवा त्यांची बाजू मांडण्यास एकही राजकीय नेता किवा एकही शेतकरी नेता पुढे आलेला नाही. खतांच्या महागाईची झळ येत्या हंगामात शेतकरयांना सहन करावीच लागणार आहे. शासनाने खतावरील अनुदान काढून घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सध्या विदर्भात सर्वत्र कडक उन्हाळा सुरू असून खरीप हंगाम सुरू होण्यास अद्याप एक महिना असला तरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने कृषी विभागाने त्यादृष्टीने आतापासून नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी खताचा तुटवडा भासू नये म्हणून आतापासून मागणी नोंदवण्यात येत आहे. जिल्ह्यात ९ लाख हेक्टर जमिनीवर खरीपाचे आणि त्या दृष्टीने खताचेही नियोजन कृषी विभागाने केले आहे. परंतु दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी देखील खताचा तुटवडा भासू शकतो असा अंदाज  वर्तवण्यात येत आहे.
केल्याने यावर्षी खतांच्या किमतीत ‘न भूतो न भविष्यति' अशी वाढ झालेली आहे. खताची पाच पटीपेक्षा अधिक वाढलेली किमत बघून शेतकरयांवर डोळे पांढरे करण्याची पाळी आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात साधारणपणे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, तर विदर्भात या व्यतिरिक्त धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. या पिकांसाठी डीएपी, युरिया, सुपर फॉस्पेट, संयुक्त खत, पोटॅश व किरकोळ खतांची आवश्यकता भासते. आकाशाला भिडलेल्या आहेत. गेल्या हंगामात डीएपी ५२२ रुपये प्रती बॅग होती. या वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच खतांच्या नव्या किमती बाजारात येऊन धडकल्या आहेत. डीएपी बॅग ५२२ वरून १०४० रुपयांवर पोहचली आहे. हंगामाच्या प्रारंभी असे असले तरी शासनाने अनुदान कमी या सर्व खतांच्या किमती आता हीच किमत १२०० पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वाढ एका बॅगवर ६६६ रुपये असणार आहे. युरियाचा खप सर्वाधिक आहे. मागील वर्षीपर्यंत युरियाची एक बॅग २७८ रुपयांना विकली जात होती. यावर्षी या बॅगची किमत ३५० रुपये इतकी झाली आहे.गतवर्षी सुपर फॉस्फेटच्या एका बॅगची
किमत २५० रुपये होती. यावर्षी ती देखील ३५० रुपयांवर गेली आहे. संयुक्त खताची किमत ४४५ रुपये प्रति बॅग होती, आता हे खत घेण्यासाठी ७७७ रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या दोन महिन्यांत इथेही २०० ते २५० रुपये वाढ अपेक्षित आहे. पोटॅश या खताची किमत २३० वरून ६१० रुपये इतकी झाली आहे. ३५० रुपये इतकी प्रचंड वाढ या खताच्या किमतीत झाली आहे. या दरवाढीमुळे शेतकरी पुरता निराश आणि हतबल झाला आहे. शेती बेभरवशाची झाली आहे. निसर्ग लहरी झाला आहे. शेतात पीक घेतले तरी निसर्गाचा काही भरवसा नाही. कधी पाऊस येतो, कधी येत नाही. कधी आलाच तर नुकसान करून जातो. अशा परिस्थितीत इतकी महागडी खते खरेदी केली आणि पीकच आले नाही तर, असा प्रश्न शेतकरयांना पडला आहे. ही दरवाढ लक्षात घेता आता शेती परवडणारी नाही अशी तीव्र प्रतिक्रिया या भागात व्यक्त होत आहे. खताच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ सध्या स्थिर राहणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत असले तरी भविष्यात खताच्या किमतीत हंगामाच्या प्रारंभी यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खताच्या किमतीत प्रचंड प्रमाणावर वाढ होत असताना याबाबत शासन दरबारी शेतकरयाची बाजू मांडून त्याच्या बाजूने लढण्यास एकही राजकीय पुढारी समोर येऊ नये, ही बाब दुर्दैवी आहे. मतांचे राजकारण करणारे पुढारी तसेच संघटनेतही स्वतःचा स्वार्थ साधणारे संधीसाधू पदाधिकारी शेतकरयांचा प्रश्न आला म्हणजे गायब होतात. नेमका हाच अनुभव आज शेतकरी घेत आहेत. एखाद्या कृषी केंद्राच्या संचालकाने मूळ किमतीपेक्षा दहा रुपये जरी अधिक घेतले तर त्याच्यावर तुटून पडणारया राजकीय नेत्यांना सरकारविरुद्ध आवाज उठवताना त्यांचे शस्त्र त्यांनीच म्यान केले आहे काय, असा संतप्त सवाल असंघटित  असलेला शेतकरी विचारत आहे

No comments: