टिपेश्वर अभयारण्यातील गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव अमान्य-१८ एप्रिलला आदिवासी पंचायत |
लोकशाही वार्ता / १५ एप्रिल |
यवतमाळ : टिपेश्वर अभयराण्यातील टिपेश्वर, पिटापुंगरी व मारेगाव या गावांचे पुनर्वसन अभयरण्याबाहेर व्हावे, ही प्रलंबित मागणी वनखा त्याचे प्रधान सचिव प्रवीण परेदशी यांच्या पाठपुराव्याने पूर्ण होत आहे. याचा पहिला टप्पा म्हणून टिपेश्वर गावाच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण रक्कम जिल्हाधिकार्यांकडे पोहोचली आहे. मात्र टिपेश्वर येथे अनेक पिढय़ांपासून शेती करून राहत असलेले कोलाम व आदिवासींना हा प्रस्ताव अमान्य असून या पुनर्वसनाबाबत आदिवास्यांना भूमिहीन होऊन जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी आदिवासी नेते व विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, माजी जि.प.सदस्य व कोलाम नेते तुकाराम मेर्शाम, पांढरकवडा येथील नगरसेवक अंकित नैताम यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पिटापुंगरी, दर्यापुरसह टिपेश्वर मधील शेतमजूर व शेतकरी आपल्या अडचणी मांडतील,अशी माहिती टिपेश्वर आदिवासी वाचवा समितीचे लक्ष्मण येडमे, कवडु टेकाम, अजाब कोवे, विठ्ठल धुर्वे, गणपत मरसकोल्हे, सुधाकर येडमे, भीमराव टेकाम, परसराम आत्राम यांनी दिली. टिपेश्वर येथील ग्रामसभेतआदिवासींनी टिपेश्वर येथील आपली वस्ती सोडण्यास संमती दिली होती. मात्र त्यांनी याच प्रस्तावामध्ये जमिनीच्या बदल्यात जमीन, गावाच्या बदल्यात पूर्ण वस्तीचे निर्माण व विस्थापित होणार्या आदिवासी कुटुंबातील युवकांना अभयारण्य वाचविण्यासाठी वनरक्षक किंवा वनकामगार म्हणून नोकरी द्यावी, अशा मागण्या रेटल्या होत्या. मात्र सरकारने या मागण्या अमान्य करून जबरीने आदिवासींचे गट पाडून राजीनामे घेण्याचे सत्र सुरू केले असून असंतोष वाढला आहे. करीता सर्वमान्य तोडगा निघावा यासाठी १८ एप्रिलला आदिवासी नेते किशोर तिवारी यांच्या मध्यस्तीने सरकार दरबारी प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती चंद्रभान कुळसंगे, कणरु शेडमाके, हनमंतु शेडमाके, वसंत मडावी, मेर्शाम, गजानन आत्राम, बळीराम कोवे, तुकाराम आत्राम यांनी दिली. |
Sunday, April 15, 2012
टिपेश्वर अभयारण्यातील गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव अमान्य-१८ एप्रिलला आदिवासी पंचायत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment