आम आदमी पार्टीने 'जन
आंदोलकांचा राष्ट्रीय संदर्भ' संपवीला -तरुण भारत
नागपूर -२० मे २०१४

आप पार्टीच्या अपरिपक्व अती हुशार ,चतुर , विचार
-धोरण विहीन असंतोषाच्या लाटेवर कोणतीही तयारी न करता ४२६ जागी निवडणूकीला
समोर जाणाऱ्या मुठभर प्रसिद्धी वेड्यांच्या सोबत तयारी न करता जाने चुकले आहे
कारण सर्वच आंदोलकांचा अनामती रकमा जप्त झाल्या असून २००च्या
वर मतदारसंघात मतदारांनी नोटा वापर केला मात्र
यांना नाकारले आहे यावर खुली चर्चा करावी अशी मागणी सुद्धा तिवारी यांनी केली आहे
महाराष्ट्राच्या आपच्या उमेदवारीचा हा आलेख (सोबत जोडला आहे)
पाहीला तर एक चटप साहेब जे आपचे नसून आयातीत उमेदवार
होते उरलेले सर्वांची अनामत रकम सरकार जमा झाली आप
पार्टीच्या स्टार प्रमुख नेते मयंक गांधी सारख्या उमेदवारांचा
खिमाच झाला मात्र आप नेत्याच्या मस्तीमुळे अनेक प्रमाणीक कार्यकत्यांना
दयनीय पराभव सहन करावा लागला हे सत्य समोर आले आहे यांनी अपक्ष
म्हणून जास्त मते घेतली असती बाब खरी असून मात्र त्यांनीसुद्धा
दिल्लीच्या सोगांड्या नेत्याच्या टेली- वीसन (दृष्टी )
तमाशावर विश्वास ठेवला व ते फसले हे आता सर्वच मान्य करीत आहेत
महाराष्ट्रात फक्त शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार आमचे
मित्र श्री चटप साहेबांना आपली अनामत वाचविता आली मात्र
२००९ मध्ये सुध्यायांनी अपक्ष म्हणून जास्त मते घेतली होती कारण 'कुणबी
समाज ' व यावेळी माजी खासदार नरेश पुगलीया यांचे बंड याचा चटप यांना टोपीचे सोंग घेऊनही झाला नाही ,अशी पुस्तीही तिवारी यांनी जोडली
१९७७ सारखी बदलाची लाट आहे त्यावर बसून सत्ता लोकांसाठी वापरू हा
अंदाच जन आंदोलकांचा चुकला याला आपची विकृत तानाशाही मंडळी ,त्यांचा अहंकार ,अती
विश्वास ,सारे चोर हा युक्तिवाद कारणीभुत आहे आता पराभवाचे थोतांड समर्थन करणे चुकीचे आहे आता गरज आहे तर आत्म चिंतनाची व आप पार्टीला रामराम ठोकण्याची ,असा सल्लाही तिवारी यांनी दिला आहे .
No comments:
Post a Comment