
तेंदुपत्ता घटकांचा लिलाव करण्याची मागणी-
लोकमतhttp://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NagpurEdition-2-8-13-02-2011-7d436&ndate=2011-02-13&editionname=nagpur
यवतमाळ, दि. १२ (वार्ताहर) - तेंदुपत्ता घटकाच्या लिलावाची प्रक्रया दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होवून जानेवारीत पूर्ण होते. मात्र गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तेंदुपत्ता घटकाचा लिलाव करू नये, असा प्रस्ताव दिल्यामुळे वनखात्याने ही प्रक्रया रोखली आहे. शासनाने येत्या पंधरवड्यात लिलाव न केल्यास यावर्षी विदर्भातील पाच लाखांवर तेंदुपत्ता मजूर १६० कोटींची
मजुरी व बोनसपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यातील तेंदुपत्ता घटकांचा लिलाव करण्याची मागणी तेंदुपत्ता मजूर समितीचे नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी ३३ वन विभागात सात लाख ५० हजारावर प्रमाण गोणीसाठी तेंदू घटकांचा लिलाव केला जातो. वर्ष २०१० मध्ये लिलावाद्वारे सरकारला ९० कोटींचा महसूल मिळाला होता. नंतर हा महसूल मजुरांना बोनस म्हणून खर्च कापून वाटण्यात आला. त्याचवेळी मजुरांना ८० रुपये शेकडा मुडक्याच्या दराने मजुरीद्वारे ६० कोटी रुपये वाटण्यात आले होते. मात्र यावर्षी अद्यापतरी लिलावाची प्रक्रया सुरू झाली नसल्याने तेंदुपत्ता मजूर मजुरीपासून वंचित राहणार असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यातील तेंदुपत्ता तोडाईचा मार्ग मोकळा करावा व तेंदुपत्ता मजूरी वाटपासोबतच तेंदुपत्ता बोनस देण्यासाठी योजना लागू करावी, अशी मागणी भीमराव नैताम यांनी केली.=======================================================
No comments:
Post a Comment