Saturday, January 10, 2009

satyam scam-Nagpur MIHAN chief is party ?


"मिहान'च्या व्यवस्थापकीय संचालकांची चौकशी व्हावी
http://www.esakal.com/esakal/01112009/Nagpur16C3F7B1A2.htm

यवतमाळ, ता. १० - संपूर्ण जगात गाजत असलेल्या सत्यम कॉम्प्युटरमधील सात हजार कोटींच्या घोटाळ्यात "मिहान'चे व्यवस्थापकीय संचालक सिन्हा यांचा सहभाग असून, त्यांच्या चौकशीची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.
सत्यम कंपनीचे मालक रामलिंकन राजू यांनी स्वतःच्या मालकीच्या मेटास इंप्रा या कंपनीमध्ये सात हजार कोटी रुपये वळते केले. नागपूर येथील मिहान या प्रकल्पासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी काढली आहे. त्याचे व्यवस्थापकीय संचालक आर. पी. सिन्हा आहेत. हा सारा कारभार त्यांच्याच स्वाक्षरीने झाला असून, महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा या पापाचे धनी असल्याचा आरोपही विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे.

समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्य सरकारचे सनदी अधिकारी आर. पी. सिन्हा यांना राजू यांच्या वादग्रस्त कंपनीचे अध्यक्ष होण्यास कोणी परवानगी दिली होती, असा सवालही त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सिन्हा हे मिहानमध्ये आलेल्या किती कंपन्यांचे अध्यक्ष आहेत, हाही खुलासा होणे गरजेचे आहे. मिहानच्या बाजूला ज्या वसाहती येत आहेत, त्या सर्व प्रकल्प चालविणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असून, त्यांची सीबीआय चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. सत्यम कॉम्प्युटरच्या स्पेशल इकॉनॉमी झोन विकसित करण्यासाठी मिहान प्रकल्पामध्ये सिन्हा ज्या कंपनीचे अध्यक्ष होते, त्या कंपनीला २०० हेक्‍टर जमीन सरकारने मातीमोल किमतीत दिली होती. या करारावर महाराष्ट्र सरकारतर्फे एअरपोर्ट विकास कंपनीतर्फे एम. डी. म्हणून सिन्हा यांनी सही केली होती. त्याचवेळेस मेटास इंप्राचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सही केली होती, असेही विदर्भ जनआंदोलन समितीच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

No comments: