Sunday, December 25, 2011

तोकड्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती- सकाळ वृत्तसेवा

तोकड्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आत्महत्या वाढण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 25, 2011 AT 12:15 AM (IST)
यवतमाळ -
मुख्यमंत्री चव्हाण यांनी पॅकेजची मदत जाहीर करून 90 लाख हेक्‍टरमधील सुमारे सात लाख शेतकऱ्यांची निराशा केली. या अपुऱ्या मदतीच्या घोषणेने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व खानदेशात नापिकी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसून उलट नैराश्‍य वाढून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोल
न समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

किशोर तिवारी म्हणाले, वारंवार निवेदन देऊनही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या मागणीला बगल दिली. जेमतेम पाच टक्के मदत जाहीर केली. मदत जास्तीत जास्त दोन हेक्‍टरपर्यंत राहील, अशी घोषणा
करून नोकरशाहीने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारच्या मदतीपेक्षा नुकसान 10 पट आहे. कापसाचा हमीभाव व नापिकीमुळे झालेली नुकसानभरपाई पश्‍चिम महाराष्ट्राच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच द्यावी लागेल, अशी मागणीही त्यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. आर्थिक नुकसानीच्या बदल्यात सरकारने तोकडी मदत दिली व महाराष्ट्रात कापसाचे भाव व्यापाऱ्यांवर सोडले तर पुन्हा एकदा हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांला सरकार आमंत्रण देत असल्याचा आरोपही श्री. तिवारी यांनी केला आहे

No comments: